Pradeep Pendhare
सुलोचना गजराज या 2010 IPS अधिकारी असून त्या हरियाण केडरच्या आहेत.
हरियाणा पोलिस दलात पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये सुलोचना गजराज यांना पोलिस उप महानिरीक्षक पदावर बढती मिळाली.
पोलिस दलात कर्तव्य बजावताना देखील मंत्र्यांच्या दबावासमोर झुकल्या नाहीत, त्यामुळे चर्चेत आल्या.
सुलोचना गजराज 2020 मध्ये प्रकाशझोतात आल्या जेव्हा हरियाणा सरकारचे राज्यमंत्री ओमप्रकाश यादव यांच्याशी भांडण झाले.
मंत्र्यांनी सुलोचना यांच्यावर भ्रष्ट आणि अक्षम असल्याचा आरोपही केला.यामुळे दुखावलेल्या सुलोचना गजराज यांनी मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाला वेग आला तेव्हा हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी राज्य गुन्हे शाखेकडून तपास केला. या चौकशीतून सुलोचना गजरात तावून-सुलाखून बाहेर पडल्या.
सुलोचना गजराज मंत्र्यांच्या दबावापुढे झुकल्या नसल्याने त्यांची हरियाणा पोलिस दलात दबंग महिला अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
सुलोचना गजराज या कोरोनाच्या काळात खूप सक्रिय होत्या. 2020 मध्ये जेव्हा कोरोनामुळे देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला तेव्हा, कर्तव्याबरोबर गरजूंना मदतही केली.