सरकारनामा ब्यूरो
भारताचे 13 वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मूळचे पश्चिम बंगाल येथील मिराती या गावाचे आहेत.
स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका निभावलेले कामदा किंकर मुखर्जी यांचे प्रणव मुखर्जी हे सुपुत्र होते.
त्यांचे आई आणि वडील दोघांनीही स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्यामुळे प्रणव मुखर्जी यांनीही राजकारणाचा मार्ग निवडला.
इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कोलकाता विद्यापीठातून वकिलीचे शिक्षण पूर्ण केले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रणव मुखर्जी यांनी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली.
राजकारणात येण्याआधी त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात उत्तम कामगिरी केली. त्यासाठी त्यांना 'मानद डिलिट' पदवी मिळाली.
त्यांनी 'पोस्ट अँड टेलिग्राफ ऑफिसमध्ये क्लार्क' म्हणूनही काम केले होते.
1969 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी राजकारणात पहिले पाऊल टाकले आणि राज्यसभेचे सदस्य बनले.
इंदिरा गांधींच्या विश्वासू नेत्यांपैकी एक असलेले प्रणव मुखर्जी हे 2012 मध्ये भारताचे 13 वे राष्ट्रपती झाले.