Vijaykumar Dudhale
संजय राऊत यांचा जन्म अलिबागमध्ये १५ नोव्हेंबर १९६१ रोजी झाला. मुंबईतील वडाळा येथील आंबडेकर कॉमर्स ॲंड इकॉनॉमिक्स महाविद्यालयातून त्यांनी बी. कॉम केले.
‘लोकप्रभा’ या साप्ताहिकात क्राईम रिपोर्टर म्हणून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली.
मुंबईतील 1980 ते 1990 च्या दशकातील गॅंगवारच्या काळात संजय राऊत यांनी धडाडीने क्राईम रिपोर्टर म्हणून नाव गाजविले.
संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरे हे १३ ऑगस्ट १९८४ मध्ये प्रथमच एकाच व्यासपीठावर समोरासमोर आले.
संजय राऊत हे ‘लोकप्रभा’साठी बाळासाहेब ठाकरेंची मुलाखत घेण्यासाठी ‘मातोश्री’वर गेले होते. अनेक प्रश्न विचारल्याने त्यावेळी बाळासाहेब राऊतांवर चिडले होते. राऊतांनी बाळासाहेब चिडल्याचेही आपल्या मुलाखतीत छापलं. तो बेधडकपणा बाळासाहेबांना आवडला होता.
बाळासाहेबांनी 23 जानेवारी 1989 रोजी ‘सामना’ची सुरुवात केली. त्यानंतर 1992 मध्ये राऊत यांना कार्यकारी संपादकपद मिळाले. राज ठाकरे यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळेच राऊतांना ‘सामना’चे संपादकपद मिळाल्याचेही सांगितले जाते.
बाळासाहेब ठाकरे यांनी संजय राऊत यांना २००४ मध्ये प्रथमच राज्यसभेचे खासदार केले. ते 2004 पासून आतापर्यंत म्हणजे 19 वर्षांपासून राज्यसभेचे खासदार आहेत.
महाविकास आघाडीच्या स्थापनेत संजय राऊतांचा सिंहाचा वाटा होता. शिवसेनेला मिळालेल्या मुख्यमंत्रिपदाचे क्रेडीटही त्यांनाच जातं. पण, त्यानंतर शिवसेना फुटीनंतरही ते उद्वव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. ईडीकडून अटक झाल्यानंतरही त्यांनी भाजपविरोधात आपला करारी बाणा कायम ठेवला आहे.