Rajanand More
डॉ. हर्षवर्धन यांनी आज राजकारणातून संन्यास घेत असल्याचे जाहीर केले. सध्या ते खासदार आहेत.
दिल्लीतून चांदणी चौक मतदारसंघातून आगामी निवडणुकीसाठी त्यांचे तिकीट कापण्यात आले आहे.
हर्षवर्धन हे कान-नाक-घसा तज्त्र. कृष्णानगरमध्ये क्लिनिक आपले वाट पाहत असल्याचे सांगत राजकारणाला रामराम.
मोदी सरकारमध्ये 2014 आणि 2019 मध्ये दोनदा केंद्रीय आरोग्यमंत्रिपद मिळाले. जुलै 2021 मध्ये दिला राजीनामा.
1993 मध्ये पहिल्यांदा आमदार. राज्याच्या कॅबिनेटमध्य आरोग्यमंत्रिपदावर वर्णी. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत विजय.
जी.एस.व्ही.एम वैद्यकीय महाविद्यालयातून अनुक्रमे 1979 आणि 1983 मध्ये वैद्यकशास्त्रात पदवी आणि पदव्युत्तर पदवी.
1993 मध्ये ते दिल्ली विधानसभेवर निवडून आल्यापासून सार्वजनिक सेवेत कार्यरत.
आरएसएसच्या एका नेत्यामुळे आपण राजकारणात आल्याचे हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
कोरोना काळात देशभरात हाहाकार असताना हर्षवर्धन होते आरोग्यमंत्री. मंत्रिपद गेल्यापासून सक्रीय राजकारणापासून दूरच.