Vijaykumar Dudhale
आंबेगाव तालुक्यात शिवाजीराव आढळराव पाटील, दिलीप वळसे पाटील आणि देवेंद्र शहा हे एकमेकांचे जिवलग मित्र होते.
लोकसभेच्या २००४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकिट न मिळाल्याने या मैत्रीमध्ये खडा पडला आणि आढळराव-वळसे पाटील यांची मैत्री तुटली.
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी २००४ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली. आढळरावांनी २००४, २००९, २०१४ या तीन निवडणूक लढवून खासदारकीची हॅटट्रीक केली.
विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर प्रथम महाविकास आघाडीच्या माध्यमातून वळसे पाटील आणि आढळराव हे प्रथमच एकत्र आले होते. त्यानंतर आता महायुतीच्या माध्यमातून हे दोन्ही नेते एकाच राजकीय व्यासपीठावर एकत्र आले होते.
शिरूर लोकसभेच्या निमित्ताने आता शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची चर्चा रंगली आहे.
आढळराव आणि वळसे पाटील यांनी तब्बल २० वर्षांनंतर एकाच गाडीतून प्रवास केला. त्यांच्यामध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या आंबेगावच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांच्या स्वागतासाठी आढळराव जाणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रीन सिग्नल दिल्यास राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीतून 'या' वादग्रस्त नेत्यांना दाखवला बाहेरचा रस्ता