सरकारनामा ब्यूरो
विक्रम साराभाई यांचा जन्म गुजरातमधील प्रसिद्ध उद्योगपती अंबालाल साराभाई यांच्या कुटुंबात झाला.
प्राथमिक शिक्षण अहमदाबादच्या गुजरात कॉलेजमध्ये घेतल्यानंतर साराभाई हे उच्च शिक्षणासाठी केंब्रिज विद्यापीठात गेले.
शिक्षण पूर्ण करून दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ते भारतात परतले आणि 1947 मध्ये त्यांनी डॉ. सी. व्ही. रमन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. पूर्ण केली.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1947 मध्ये त्यांनी देशाची गरज ओळखून भौतिक संशोधन प्रयोगशाळा (पीआरएल) स्थापन केली आणि भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमावर काम सुरू झाले.
तरुण वयातच डॉ. साराभाईंनी 'इस्रो'सारखी संस्था स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
आर्यभट्टच्या नंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व यांचा मोलाचा वाटा आहे.
डॉ. विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट तसेच विविध संस्थांची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून डॉ. साराभाई यांनी जबाबदारी पार पाडली.
भारतात अवकाश संशोधनाचे महत्त्व रुजवणारे डॉ. विक्रम साराभाई यांचा मोलाचा वाटा आहे.