Deepak Kulkarni
लोकसभेत सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे एकूण 17 खासदारांना संसदरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सुप्रिया सुळे या सातत्यानं त्यांच्या बारामती मतदारसंघातील समस्यांसह महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर आवाज उठवत असतात.
मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार असलेले श्रीरंग बारणेंना यापूर्वीही संसदरत्न पुरस्कार मिळवला आहे.
मेधा कुलकर्णी या भाजपच्या राज्यसभा खासदार आहे. त्यांची ही खासदारकीची पहिलीच टर्म आहे.
अरविंद सावंत यांची शिवसेनेतील राजकीय कारकीर्द 50 वर्षांची राहिली आहे.
काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या वर्षा गायकवाड या कन्या असून त्यांना वडिलांच्या राजकारणाचा वारसा आहे. २०१९ मध्ये गायकवाड या चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. 2024 च्या निवडणुकीत त्या लोकसभेवर निवडून गेल्या आहेत.
17 व्या लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव मतदारसंघातून स्मिता वाघ यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली होती..
नरेश गणपत म्हस्के हे महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते आहेत. २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ते खासदार म्हणून निवडून आले. याआधी ते नोव्हेंबर 2019 ते मार्च 2022 या कालावधीत ते ठाणे महापालिकेचे महापौर होते.