Vijaykumar Dudhale
सातारा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे.
श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे
श्रीनिवास पाटील यांच्या माघारीनंतर लोकसभेचा उमेदवार ठरविण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी साताऱ्याचा दौरा केला.
शरद पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती.
साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यास शरद पवार यांनीही नकार दिला आहे. माझ्यावर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील जबाबदारी असल्यामुळे मला निवडणूक लढविणे शक्य नाही, असे पवार यांनी नमूद केले.
सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी चार नावे पुढे आली आहेत. यामध्ये शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने आणि सत्यजित पाटणकर यांचा त्यामध्ये समावेश आहे.
सातारा लोकसभेसाठी माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि बाळासाहेब पाटील यांच्यात उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे नाव सातारा लोकसभेसाठी निश्चित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.