Akshay Sabale
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते माजी कमलनाथ यांचे सुपुत्र नकुल नाथ यांनी छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
नकुल नाथ यांनी अर्जाबरोबर वैयक्तिक माहितीसह पार्श्वभूमीवर संपत्तीचं विवरणही जोडलं आहे. त्यानुसार तब्बल 700 कोटींची संपत्ती त्याच्याकडं आहे.
गेल्या 5 वर्षांच्या काळात नकुल नाथ यांच्या संपत्तीत 40 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
रोकड, शेअर्स आणि बाँडसह 649.51 कोटी रुपयांची स्थावर, तर 48.08 रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचं नकुल नाथ यांनी निवडणूक आयोगाकडील विवरण पत्रात घोषित केलं आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत 475 करोडपती खासदार होते. त्या यादीत नकुल नाथ अव्वल स्थानी होते.
'एडीआर' अर्थ असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या आकडेवारीनुसार नकुल नाथ यांनी 2019 मध्ये 660 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती.
नकुल नाथ यांच्याकडे स्वत:ची कार नाही. पत्नीजवळ फक्त 43 हजार रुपयांची नकद रक्कम आहे. तसेच, नकुल नाथ यांनी वडील कमल नाथ यांना 12 लाख रुपये कर्जानं दिले आहे.
2019 मध्ये नकुल नाथ यांनी छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे मध्य प्रदेशातून नकुल नाथ एकमेव काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून गेले होते.
R