सरकारनामा ब्यूरो
29 नोव्हेंबर 2005 मध्ये त्यांची पहिल्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली.
शिवराजसिंह चौहान मध्य प्रदेशचे चार वेळा मुख्यमंत्री राहिले. मध्य प्रदेशचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रिपद त्यांनी भूषवले आहे.
वयाच्या 13 व्या वर्षापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांसारख्या संघटनांमध्ये सक्रिय कार्यास सुरुवात केली.
संघटनांमधील सहभागामुळे भाजप नेत्यांशी त्यांची जवळीक वाढली. तेथून त्यांचा कल राजकारणाकडे वाढत गेला, त्यानंतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही पार पाडल्या.
राज्यातील स्त्री भ्रूणहत्या निर्मूलनासाठी त्यांनी अमलात आणलेल्या योजना आणि त्यावरील उपाययोजनांसाठी ते प्रसिद्ध आहेत.
नागरिकांना चांगले जीवन देण्यासाठी रोज नवनवीन योजनेसोबतच मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या पुढील भविष्यासाठी मदत मिळेल अशा योजनाही त्यांनी राबवल्या.
1991 मध्ये ते संसदेत निवडून आले. वर्ष 2000 ते 2004 पर्यंत दळणवळण मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य राहिले.
राज्यातील मुलांमध्ये मामा म्हणून ओळखले जाणारे चौहान हे बुधनी विधानसभा मतदारसंघाचे सदस्य आहेत.
विदिशा लोकसभा मतदारसंघात त्यांना पांव-पांव वाले भैया असेही म्हणतात, कारण त्यांनी राज्यात अनेक पदयात्रा केल्या आहेत.
R