Sunil Balasaheb Dhumal
भारताची महत्त्वकांक्षी सौर मोहीम सुरू असतानाच इस्त्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती.
चंद्रयान 3 मोहिमेपासूनच त्यांना आरोग्यविषय समस्या सुरु झाल्या होत्या. मात्र, कॅन्सर झाल्याबाबत त्यांना कल्पना नव्हती.
आदित्य एल 1 च्या लाँचिंग दिवशीच कॅन्सर झाल्याचे माहिती मिळाली, असे एस सोमनाथ यांनी आता स्पष्ट केले आहे.
आजारपणाचा सौर मोहिमेवर कुठलाही परिणाम होणार नाही, याची काळजी घेत कुटुंब आणि सहकाऱ्यांना सावरले.
चेन्नईत उपचार घेताना हा आजार अनुवंशिकतेने झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
एस. सोमनाथ यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. तसेच त्यांच्यावर किमोथेरपीही सुरू आहे.
उपचारानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.
इस्रोचे सर्व मिशन मी पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धारही सोमनाथ यांनी केला.