Mangesh Mahale
राजस्थान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्रजितसिंह मालवीय यांनी पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.
गृहमंत्री अमित शाह यांच्या राजस्थान दौऱ्यापूर्वी त्यांनी काँग्रेसचा 'हात' सोडून हातात 'कमळ' धरले.
राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह, प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यासोबत मालवीय नुकतेच दिल्लीला गेले होते.
अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
मोदी सरकारने केलेल्या विकासकामांनी प्रभावित होऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.
ते चार वेळा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले आहेत. गेहलोत सरकारमध्ये ते मंत्री होते.
मालवीय यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकारणात एन्ट्री घेतली.
महेंद्रजित मालवीय हे सरपंच- खासदार आणि नंतर ते आमदार झाले.
१९९८मध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
R