Rashmi Mane
राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्ष खासदार फौजिया खान यांचा आज वाढदिवस.
उच्च विद्याविभूषित व पक्षाचा एक सुशिक्षित चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते.
फौजिया खान यांच्या राजकीय वाटचालीची सुरुवात ही परभणी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासून झालेली आहे.
राजकारणात येण्याआधी त्या शिक्षिका होत्या. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना थेट विधान परिषदेवर संधी दिली.
यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही, त्या थेट राज्यमंत्रिपदापर्यंत पोहोचल्या.
2008 ते 2014 दरम्यान राज्यमंत्री होत्या. फौजिया खान या काही काळ परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीदेखील राहिल्या आहेत.
मंत्रिमंडळात निवड झालेल्या त्या राज्यातील मुस्लिम समाजातील पहिल्या महिला ठरल्या होत्या.
R