सरकारनामा ब्यूरो
फ्रान्समधील उजव्या विचारसरणीच्या मातब्बर नेत्या म्हणून ओळख असलेल्या मरीन ले पेन यांना न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. एका प्रकरणात चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि पाच वर्षे निवडणूक लढण्यास त्यांच्यावर बंदी घातली आहे.
युरोपियन संसदेच्या निधीचा बेकायदेशीररित्या वापर करून कार्यकर्त्यांना युरोपियन युनियनच्या कामकाजाऐवजी पक्षीय कामासाठी पैसे दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
मरीन ले पेन आणि त्यांच्या कार्यकर्त्यानी हे आरोप फेटाळून लावला होते. मात्र त्या या आरोपात दोषी आढळल्याने त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पेन यांना 4 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून या शिक्षेदरम्यान दोन वर्षे कडक देखरेखीखाली घालवावी लागतील. 5 वर्षासाठी कोणतीही निवडणूक त्या लढू शकणार नाहीत. 1 लाख पाउड रुपये दंडही ठोठावला आहे.
पॅरिसच्या रहिवासी असलेल्या मरिन यांनी असास विद्यापीठातून कायद्यात पदव्युत्तरचे शिक्षण घेतले. यानंतर 1991ला त्यांनी फौजदारी कायद्यात डिप्लोमा प्राप्त करत पदव्युत्तर झाल्या.
मरीन ले पेन या फान्सच्या प्रसिद्ध राजकीय नेत्या आणि वकील म्हणून ओळखल्या जातात.
2012, 2017, 2022 या वर्षी त्यांनी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवली होती. आता त्यांना 2027 ची निवडणूकही लढता येणार नाही.
नॅशनल रॅली पार्टीच्या 2011 ते 2021 या कालावधीत त्यांनी अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला. 2017 पासून 11 व्या मतदारसंघातून राष्ट्रीय असेंब्ली सदस्य होत्या.