Rashmi Mane
बाल आधार अपडेटची नवी मोहिम! UIDAI कडून शाळांमधूनच बायोमेट्रिक अपडेट सुरू होणार.
नवजात व 5 वर्षांखालील मुलांचे आधार कार्ड त्यांच्या कोणत्याही बायोमेट्रिक माहितीशिवाय तयार होते. पण वय वाढल्यावर बायोमेट्रिक अपडेट करणे गरजेचे असते.
UIDAI नुसार, 5 वर्षांनंतर बायोमेट्रिक अपडेट अनिवार्य आहे. यामुळे आधारची विश्वासार्हता टिकून राहते.
जर 7 वर्षांपर्यंत बायोमेट्रिक अपडेट नसेल केलं, तर त्या मुलाचं आधार कार्ड निष्क्रिय होऊ शकतं.
UIDAI आता शाळांमधूनच बायोमेट्रिक अपडेट सुरू करणार आहे. मुलांच्या पालकांची परवानगी घेऊनच हा अपडेट केला जाईल.
या योजनेअंतर्गत 45-60 दिवसांत देशभरातील शाळांमध्ये बायोमेट्रिक मशीन पाठवल्या जातील. सुमारे 7 कोटी मुलांना याचा फायदा होणार आहे.
5 ते 7 वर्षे वयोगटातील बायोमेट्रिक अपडेट मोफत आहे. 7 वर्षांनंतर अपडेटसाठी 100 शुल्क लागणार आहे.
शालेय प्रवेश, शिष्यवृत्ती, प्रवेश परीक्षा आधार अपडेट आवश्यक आहे.