Rashmi Mane
नोकरीच्या शोधात आहात? तर सरकारच्या कौशल्य प्रशिक्षण पोर्टलवरून विविध अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण घेऊन रोजगाराची संधी मिळवू शकता.
केंद्र सरकारच्या Skill India Digital Hub या पोर्टलवर विविध कौशल्य विकास अभ्यासक्रमांची माहिती उपलब्ध आहे.
आयटी, डिजिटल मार्केटिंग, आरोग्य सेवा, इलेक्ट्रॉनिक्स, ब्युटी आणि पर्यटन अशा क्षेत्रांतील अभ्यासक्रम निवडता येतात.
विद्यार्थी, बेरोजगार तरुण आणि कौशल्य वाढवू इच्छिणारे उमेदवार पात्रतेनुसार प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात.
पोर्टलवर नोंदणी करून आवडीचा अभ्यासक्रम आणि उपलब्ध प्रशिक्षण केंद्र निवडता येते.
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पात्र उमेदवारांना प्रमाणपत्र मिळू शकते. याचा उपयोग नोकरी शोधताना होऊ शकतो.
काही प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये रोजगार मार्गदर्शन आणि प्लेसमेंटसाठी मदतही दिली जाते. मात्र नोकरीची हमी नसते.
अधिक माहितीसाठी [Skill India Digital Hub www.skillindiadigital.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्या. अभ्यासक्रमाची पात्रता, शुल्क आणि प्रवेशाच्या अटी तपासून नोंदणी करा.