राज्य परिवहन महामंडळाचा मोठा निर्णय; १ जूनपासून ST स्थानकांवरील स्वच्छतागृह सेवा विनामूल्य

सरकारानामा ब्युरो

प्रवाशांना सुविधा

एसटी स्वच्छतागृहे आता मोफत करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. अंमलबजावणी 1 जूनपासून होणार आहे.

ST bus stand toilets free | Sarkarnama

स्वच्छता अधिभार

स्वच्छता अधिभार भरणाऱ्या प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळाकडून आता दिलासा मिळणार आहे.

ST bus stand toilets free | Sarkarnama

मोफत

राज्यातील एसटी स्थानकांतील सर्व स्वच्छतागृहांचा वापर प्रवाशांसाठी मोफत करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.

ST bus stand toilets free | Sarkarnama

दर चार तासांनी

स्थानक-आगारात दर चार तासांनी स्वच्छता, पाणपोईची स्वच्छता आणि देखभाल, चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांमधील सुविधा सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे.

ST bus stand toilets free | Sarkarnama

वर्धापनदिनानिमित्त

महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त, अर्थात १ जूनपासून याची अंमलबजावणी होणार आहे. सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू झाल्याने प्रवासी वर्दळ वाढती आहे. त्यामुळे अस्वच्छतेत आणखी भर पडत आहे.

ST bus stand toilets free | Sarkarnama

दर्जा सुधारण्यासाठी

एसटी स्थानक-आगारांसह स्वच्छतागृहे, चालक-वाहकांची विश्रांतीगृहे, पाणपोई यांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रतितिकीट दोन रुपये स्वच्छता अधिभार १५ एप्रिलपासून लागू करण्यात आला आहे.

ST bus stand toilets free | Sarkarnama

स्वच्छतागृहांची स्वच्छता

सुलभ शौचालय, वाल्मिकी मेहतर समाज आणि एसटी महामंडळ अशा संस्थांकडून महामंडळाच्या स्वच्छतागृहांची स्वच्छता केली जाते. अनेक ठिकाणी याचा वापर करण्यासाठी पाच ते १० रुपये आकारले जातात.

ST bus stand toilets free | Sarkarnama

दर्जा सुधारणार

एसटीच्या दुर्लक्षित पाणपोई पुन्हा सुरू करण्यासह त्यांची देखरेख करण्यात येणार आहे. चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहाचा दर्जा सुधारण्यासह गरम पाण्याचा पुरवठाही केला जाणार आहे.

ST bus stand toilets free | Sarkarnama

NEXT: भावी CM च्या सर्वात विश्वासू सहकाऱ्याची हत्या; एअर फोर्स ते राजकारण, कोण होते चंद्रनाथ रथ?

येथे क्लिक करा