सरकारनामा ब्यूरो
दिलखुलास मित्र आणि उमदा विरोधक बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे काही खास फोटो !
देशाच्या राजकारणातील एक मुरब्बी आणि कणखर नेतृत्व शरद पवार हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीचे कधीही जनते समोर न आलेले पैलू.
या दोन्ही नेत्यांचे पक्ष, विचार आणि एकूणच राजकारण जरी वेगळं असलं तरी त्यांची मैत्री ही या सर्वांपलीकडे होती.
बाळासाहेब आणि शरद पवार यांच्यातील मैत्री आणि शाब्दिक हल्ले संपूर्ण महाराष्ट्र जाणतो.
शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कौटुंबिक नाती आणि राजकारण त्यांनी ज्या-त्या जागी ठेवलं.
जशा निवडणुका जवळ यायच्या तसतसे या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी उडायच्या.
बाळासाहेब आपल्या कुंचल्यातून शरद पवारांना मार्मिक फटकारेही मारायचे.
बाळासाहेब नेहमीच शरद पवारांना 'शरद बाबू' म्हणून हाक मारायचे. अनेकदा त्यांनी व्यंगचित्रांमध्ये पवारांचा 'बारामतीचा म्हमद्या', 'मैद्याचं पोतं' असा ठाकरी भाषेत उल्लेख केला आहे.