New Rule : बँक नॉमिनीपासून क्रेडिट कार्डपर्यंत; 1 नोव्हेंबरपासून बदलणार हे 5 नियम, तुमच्या खिशावर होणार परिणाम!

Rashmi Mane

नोव्हेंबरपासून बदलणार नियम!

बँक खात्यांपासून पेंशनपर्यंत सर्वसामान्य नागरिक, बँक ग्राहक आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर थेट परिणाम करणार आहेत हे नवीन नियम.

नवे नियम लागू

1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि रोजच्या आयुष्यावर होईल. जाणून घ्या कोणते आहेत हे 5 मोठे बदल!

बँक खात्यात आता 4 नॉमिनीपर्यंत परवानगी

1 नोव्हेंबरपासून बँकमध्ये नॉमिनेशन संदर्भातील नवे नियम लागू होत आहेत.
आता एका खात्यात 4 व्यक्तींना नॉमिनी म्हणून जोडता येईल.

SBI क्रेडिट कार्डसाठी नवे चार्जेस

SBI कार्डधारकांसाठी मोठा बदल! 1 नोव्हेंबरपासून CRED, Cheq, MobiKwik सारख्या थर्ड पार्टी अॅप्समार्फत शिक्षणाशी संबंधित पेमेंटवर 1% शुल्क आकारले जाईल.

वॉलेट लोडिंगवरही फी लागू

जर तुम्ही 1,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम वॉलेटमध्ये लोड करत असाल, तर आता त्यावरही 1% चार्ज आकारला जाईल. म्हणून ट्रान्झॅक्शन करण्याआधी विचार करा, लहान रक्कमांवर परिणाम टाळता येईल.

पेन्शनर्ससाठी महत्त्वाच्या तारखा

केंद्र आणि राज्य सरकारचे पेन्शनधारकांनी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 या काळात आपले लाइफ सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे. हे सर्टिफिकेट डिजिटल किंवा प्रत्यक्ष स्वरूपात दिले जाऊ शकते. वेळेत सादर केल्यास पेन्शनमध्ये व्यत्यय येणार नाही.

NPS ते UPS मध्ये बदलाची मुदत वाढली

जे केंद्र सरकारचे कर्मचारी NPS वरून युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) मध्ये येऊ इच्छितात, त्यांच्यासाठी अंतिम तारीख आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे.

LPG सिलेंडरच्या दरात बदल

दर महिन्याप्रमाणेच, 1 नोव्हेंबरला एलपीजी सिलेंडरच्या किंमतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांत कमर्शियल सिलेंडर दरांत चढ-उतार दिसले आहेत.
म्हणून या महिन्यातील नवा दर लागू होऊ शकतो.

Next : वाहनधारकांसाठी ‘KYV’ ची सक्ती; नेमकं काय आहे हा नवा नियम?

येथे क्लिक करा