सरकारनामा ब्यूरो
'कोशिश करने वालों की हार नही होती'.. या कवितेतील अर्थ यासिन यांनी परत एकदा सिध्द करून दाखवला आहे...त्यांनी आपल्या जिद्द आणि चिकाटीतून परिस्थितीवरही मात करून यश संपादन केले...जाणून घ्या त्यांची प्रेरणादायी कथा...
यासिन यांचा जन्म केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील पट्टांबी या शहरात झाला. त्यांचे बालपण आईच्या सानिध्यातच गेले.
त्यांनी अवघे 6 वर्षाचे असतानाच वर्तमानपत्र आणि दूध वाटप करण्याच्या कामाला सुरूवात केली. त्यासोबतच आपले शिक्षणही चालू ठेवले.
त्यांनी लोकप्रशासन विषयात आपले पदवीचे शिक्षण पूर्ण करत असतानाच बांधकामाच्या ठिकाणी मजूरी आणि पेंटींग केले.
केरळच्या विधी महाविद्यालयातील प्रवेश परीक्षेत त्यांनी 46 वा क्रमांक मिळवला. नंतर त्यांनी एर्नाकुलममधील एका सरकारी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
त्यांनी दिवसा कॉलेजचा अभ्यास केला आणि रात्री झोमॅटोसाठी डिलिव्हरी बॉय म्हणूनही काम केले.
त्यांनी केरळ न्यायिक सेवा परीक्षेत दुसरा क्रमांक पटकावला आणि न्यायाधीश होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले.