सरकारनामा ब्यूरो
असे अनेक लोक आहेत जे UPSC ची परीक्षा देण्यासाठी चांगल्या पगाराची नोकरी सोडतात. पण एक असे आयपीएस अधिकारी आहेत ज्यांनी निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. कोण आहेत ते अधिकारी जाणून घेऊयात..
आनंद मिश्रा अस या IPS अधिकाऱ्याचं नाव आहे ते बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील बक्सर गावचे रहिवासी आहेत.
भोजपूर येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी झेवियर्स कॉलेजमधून पदवी मिळवली.
यानंतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी केली आणि वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले.
आनंद यांच पहिली पोस्टिंग नागाव येथे करण्यात आलं. याच पोस्टिंग दरम्यान त्यांनी नागाव जिल्ह्यात ड्रग माफियांविरुद्ध मोठी कारवाई केली होती. यामुळे त्यांचं नाव आसाममधील सर्वात धडाकेबाज पोलिस अधिकाऱ्यांमध्ये घेतलं गेलं.
2011 च्या बॅचचे आयपीएस आनंद हे आसाममधील लखीमपूर जिल्ह्यात एसपी म्हणून कार्यरत होते.
मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीसाठी त्यांची नियुक्ती विशेष तपास पथकात करण्यात आली होती.
मिश्रा यांना 2024 ची लोकसभा निवडणूक लढवायची होती त्यामुळे त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. मिश्रा यांनी IND या पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती. आता त्यांची जन सुराज्य या पक्षात युवा अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.