Jagdish Patil
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांना 1955 मध्ये भारतरत्न प्रदान करण्यात आला. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
तर दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना 1966 मध्ये मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला. "जय जवान, जय किसान" चा नारा देत शास्त्रीजींनी देशाला एकता आणि सशक्तीकरणाची प्रेरणा दिली.
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना 1971 मध्ये भारतरत्न देण्यात आला.
राजीव गांधी यांना 1991 मध्ये मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रात नवीन उंची गाठली.
वाजपेयी यांना 2015 मध्ये भारतरत्न देण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अणुचाचणी आणि रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासात ऐतिहासिक पावले उचलली.
जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 या काळात भारताचे पंतप्रधान राहिलेल्या चौधरी चरण सिंग यांच्या कार्याचा आणि योगदानाचा गौरव करण्यासाठी, त्यांना 2024 मध्ये मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला.
पी. व्ही नरसिंह राव यांना 2024 साली मोदी सरकारने भारतरत्न देऊन सन्मानित केलं होते. त्यांना उदारमतर भारतरत्न हा नागरी सन्मान देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.
तर भारतरत्न हा नागरी सन्मान असून त्याला पदक आणि प्रतिकृती दिली जाते. तर भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीला कोणतेही मानधन दिले जात नाही.