Jagdish Patil
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती 25 डिसेंबर रोजी साजरी केली जाते.
अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे 25 डिसेंबर 1924 रोजी झाला.
वाजपेयी 3 वेळा पंतप्रधान म्हणून भारताचं नेतृत्व केलं आहे. एक राजकीय नेता असण्यासह ते कवी, पत्रकार आणि प्रभावशाली वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत.
वाजपेयी यांना अजातशत्रू राजकारणी म्हटलं जातं. कारण विरोधी पक्षांनी देखील कधी त्यांचा तिरस्कार केला नाही.
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना कोणते धाडसी निर्णय घेतले ते जाणून घेऊया.
11 आणि 13 मे 1998 रोजी पोखरणमध्ये 5 भूमिगत अणुचाचण्या घेत त्यांनी भारताला अणुऊर्जा देश घोषित केलं.
पाकिस्तानशी संबंध सुधारण्याच्या उद्देशाने त्यांनी 19 फेब्रुवारी 1999 रोजी 'सदा-ए-सरहद' नावाने दिल्ली ते लाहोर बससेवा सुरू केली.
1990 मध्ये कारगिल युद्धात पाकिस्तानच्या कब्जात असलेली भारताची जमीन मुक्त केली.
भारताच्या चारही बाजूंना (दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई) रस्त्याने जोडणारा सुवर्ण चतुर्भुज प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात सुरू झाला.