Roshan More
केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार कोट्यवधीचा घोटाळा करून पळून गेलेले 30 जण परदेशात मध्ये आहेत. 2020 और 2021 मध्ये ही संख्या 84 और 136 होती.
विजय मल्ल्या याने 9 हजार कोटी कर्ज प्रकरणी बँकांची फसवणूक करत परदेशी पळ काढला होता. मल्ल्या आता यूकेमध्ये स्थायिक झाला आहे.
ललित मोदी याच्यावर 125 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. आयकर आणि ईडीकडून त्याची चौकशी सुरू होती. मात्र तो यूकेला पळून गेला. मनी लाँड्रिंग प्रकरणी देखील त्याची चौकशी सुरू होती.
देशसोडून पळून गेलेल्यांमध्ये नीरव मोदीचा देखील समावेश आहे.आर्थिक घोटाळ्या प्रकरणी तपासासाठी त्याला भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मेहुल चोक्सी 13,500 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. 2018 मध्ये सीबीआयने त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.
नितीन संदेसरा हा गुजरातमधील उद्योगपती होता. त्याने 5700 कोटी रुपयांचा घोटाळा केला. मनी लाँड्रिंग प्रकरणी देखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. तो देखील देश सोडून पळून गेला आहे.
नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात हे घोटाळे झाले. त्यामुळे विरोधी पक्षाकडून नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्यात आले.
बँकांकडून कर्ज घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली. त्यामुळे या घोटाळेबाजांमुळे बँकांना मोठा फटका बसला.