Job Rule Change: राजीनामा देणार असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची; आजपासून 'Code on Wages' नियम लागू

Mangesh Mahale

नवा नियम

सध्याच्या नोकरीला कंटाळला असाल आणि राजीनामा देण्याच्या विचारात असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.1 एप्रिल 2026 पासून कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा नियम लागू होत आहे.

Full & Final Settlement Rules Changed from April 1, 2026 | Sarkarnama

सेटलमेंट

कंपनी सोडल्यानंतर हक्काचा पगार, सुट्ट्यांचे पैसे आणि इतर थकबाकी मिळवण्यासाठी 3 ते 4 महिने वाट पाहावी लागते. आत्तापर्यंत नोकरी सोडल्यानंतर सेटलमेंटसाठी 45 ते 90 दिवस लागायचे.

Full & Final Settlement Rules Changed from April 1, 2026 | Sarkarnama

Code on Wages

नव्या 'कोड ऑन वेजेस' (Code on Wages) च्या कलम 17(2) नुसार नोकरी सोडल्यानंतर (शेवटचा कामकाजाच्या दिवसानंतर), कंपनीला पुढील 48 तासांच्या आत त्याचे सर्व पेमेंट करुन अकाउंट क्लोज करणे बंधनकारक आहे.

Full & Final Settlement Rules Changed from April 1, 2026 | Sarkarnama

'ले-ऑफ'

तुम्ही स्वतः राजीनामा दिला असो, कंपनीने तुम्हाला कामावरून काढले असो किंवा 'ले-ऑफ' झाला असो, हा नियम सर्वांना समान लागू असेल.

Full & Final Settlement Rules Changed from April 1, 2026 | Sarkarnama

कायद्याचा भंग

जर कंपनीने 48 तासांत पैसे दिले नाहीत, तर तो कायद्याचा भंग मानला जाईल. अशा वेळी तुम्ही कामगार विभागाकडे तक्रार करू शकता आणि उशिरा मिळालेल्या पैशांवर व्याजाची मागणीही करू शकता.

Full & Final Settlement Rules Changed from April 1, 2026 | Sarkarnama

1 वर्षांनंतरही ग्रॅच्युइटी

ग्रॅच्युइटी मिळवण्यासाठी किमान 5 वर्षे सतत काम करणे आवश्यक आहे.नव्या नियमानुसार, तुम्ही 1 वर्ष सेवा पूर्ण केली असेल, तर तुम्ही ग्रॅच्युइटीसाठी पात्र ठराल. नोकरी सोडल्यानंतर 30 दिवसांच्या आत ही रक्कम तुमच्या खात्यात जमा होणे अनिवार्य आहे.

Full & Final Settlement Rules Changed from April 1, 2026 | Sarkarnama

सॅलरी स्लीप बदलणार

पगाराच्या संरचनेत मोठा बदल नव्या कामगार कायद्यामुळे तुमच्या सॅलरी स्लीपचं स्वरूपही बदलणार आहे: बेसिक सॅलरी 50०%तुमच्या एकूण सीटीसी (CTC) पैकी किमान 50 % रक्कम ही तुमची बेसिक सॅलरी असावी लागेल.

Full & Final Settlement Rules Changed from April 1, 2026 | Sarkarnama

पीएफ

पीएफमध्ये वाढपीएफची वजावट बेसिक सॅलरीवर अवलंबून असते. बेसिक वाढल्यामुळे तुमच्या पीएफ खात्यात दरमहा जास्त पैसे जमा होतील, जे तुमच्या निवृत्तीनंतरच्या काळासाठी फायदेशीर ठरेल.

Full & Final Settlement Rules Changed from April 1, 2026 | Sarkarnama

टेक-होम सॅलरी

पीएफ जास्त कापला गेल्यामुळे तुमच्या हातात येणारा मासिक पगार (Take-home salary) थोडा कमी होऊ शकतो, पण दीर्घकालीन बचतीच्या दृष्टीने हे अत्यंत फायदेशीर आहे.

Full & Final Settlement Rules Changed from April 1, 2026 | Sarkarnama

NEXT: फडणवीसांनी 'मेट्रोवुमन'वर सोपवली मुंबईची जबाबदारी! कोण ठरल्या पहिल्या महिला आयुक्त?

येथे क्लिक करा