Mangesh Mahale
मेट्रो वूमन अशी ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावर शिक्कामोर्तब झाला आहे.
अश्विनी भिडे या आज पदभार स्वीकारणार आहेत. अश्विनी भिडे मुख्यमंत्र्यांच्या अतिरीक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या.
आश्विनी भिडे या 1995 च्या बॅचच्या आएएस अधिकारी आहेत. त्यांना सनदी सेवेतील 25 वर्षांचा अनुभव आहे.
मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे आज निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी भिडे यांची नियुक्ती होणार आहे.
अश्विनी भिडे यांना आयुक्तपदाचा तीन वर्षांचा पूर्ण कार्यकाळ मिळणार आहे.
अश्विनी भिडे यांनी यापूर्वी बीएमसीमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिले आहे.
मुंबईतील पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रो (मेट्रो-३) प्रकल्पाला कठीण परिस्थितीत मार्गी लावण्याचे श्रेय त्यांना जाते.
कडक कार्यशैली आणि ‘डिलिव्हरी ओरिएंटेड’ कामासाठी त्या ओळखल्या जातात.