सरकारनामा ब्युरो
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गडचिरोलाचा दौरा केला. अगदी अबुजमाडच्या जंगलापर्यंतच्या परिसराला त्यांनी भेट दिली.
मागील काही काळात गडचिरोलीचे पालकमंत्रिपद म्हणजे शिक्षा वाटण्यापेक्षा महत्वाचे पद समजू जाऊ लागले आहे.
याआधी ठाकरे सरकारमध्ये नगरविकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे इथले पालकमंत्री होते.
त्यानंतर शिंदे सरकारमध्ये आणि आताही देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रिपद स्वतःकडे ठेवले आहे.
पण दिवंगत आर. आर. पाटील यांच्यामुळे गडचिरोलीचे पालकमंत्री पहिल्यांदा चर्चेत आले होते.
गडचिरोलीत 2009 मध्ये नक्षलवादी हल्ल्यात 52 पोलिस शहीद झाले होते. अनेक नागरिकांनाही नक्षलवाद्यांनी लक्ष्य केले.
यावरून हिवाळी अधिवेशनात विरोधक सरकारवर तुटून पडले. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनाही लक्ष्य केले गेले.
नक्षलवाद्यांना गोळीनेच उत्तर देण्याचे धोरण आहे. सरकार ठामपणे पोलिसांच्या पाठीशी आहे, असे ते जीव तोडून सांगत होते.
तेव्हा अचानक ‘तुम्ही गडचिरोलीचेच पालकमंत्री व्हा’, असे आव्हान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
पाटील यांनी लगेच ते आव्हान स्वीकारले आणि तेव्हापासून आर. आर. पाटील पुढील पाच वर्षे जिल्ह्याचे पालकमंत्री होते.
प्रशासनाला शिस्त लावणं, स्वतःसह प्रत्येक सचिवाने दोन दिवस गडचिरोलीला भेटी देणे, असे उपक्रम आर. आर. पाटील यांनी सुरु केले.
प्रशासन दुर्गम भागापर्यंत पोहोचू लागले. पाटील यांच्या काळाता जिल्ह्याला जवळपास 850 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला.