Roshan More
गार्ड ऑफ ऑनर ही भारताची पारंपरिक सन्मान व्यक्त करण्याची पद्धत आहे.
जागतिक स्तरावर मान्य असलेल्या राजनैतिक शिष्टाचारानुसार गार्ड ऑफ ऑनर दिला जातो. गार्ड ऑफ ऑनर म्हणजे भारत सरकारकडून त्या मान्यवराचे औपचारिक स्वागत.
भारतीय लष्कर, नौदल किंवा हवाई दलाकडून अतिथ्याला सशस्त्र सलामी दिली जाते.राष्ट्रपतींना 150 सैनिक, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांना 100 सैनिक, तर इतर व्हीव्हीआयपींना 50 सैनिक गार्ड ऑफ ऑनर देतात.
या माध्यमातून दोन देशांतील संबंध अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जातो.गार्ड ऑफ ऑनर दिल्याने त्या व्यक्तीच्या आणि त्यांच्या देशाच्या प्रतिष्ठेला मान दिला जातो.
गार्ड ऑफ ऑनर देणाऱ्या तुकडीचा पोशाख, शिस्त आणि समन्वय विशेष असतो.हा समारंभ सहसा राष्ट्रपती भवन, विमानतळ किंवा राजभवनात होतो.
गार्ड ऑफ ऑनर हा शहीद सैनिकांच्या अंतिम यात्रेच्या वेळी, लष्करी कार्यक्रमांमध्ये किंवा सैन्यप्रमुखांना विशेष प्रसंगी दिला जातो. हा सन्मान आणि श्रद्धांजली यांचे प्रतीक आहे.
NEXT : 45 किलो सोन्याने सजलेलं अयोध्या राम मंदिर, सोन्याची आजची किंमत किती?