Jagdish Patil
गडचिरोलीतील पोलीस मुख्यालयात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर तब्बल 61 माओवाद्यांनी राज्याचे शस्त्र खाली ठेवत शरणागती पत्करली.
माओवादी नेता मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याच्या आत्मसमर्पणामुळे आता राज्यातून माओवाद हद्दपार होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
भूपतीच्या शरणागतीमुळे माओवाद विरोधातील लढ्यात गडचिरोली पोलिसांनी कुठल्याही रक्तपाताशिवाय मोठा विजय मिळवला आहे.
या सर्व घडामोडीत माओवाद्यांचा नेता मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याचं नाव चांगलंच चर्चेत आहे.
तर तब्बल 6 कोटींचे बक्षीस असलेला आणि स्वत: मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच शरण येणार अशी अट ठेवणारा मल्लोजूला वेणुगोपाल नेमका कोण आहे? ते जाणून घेऊया.
भूपती हा नक्षल चळवळीचा मास्टरमाईंड समजला जातो. याच वर्षी 1 जानेवारीत त्याची पत्नी तारक्काने गडचिरोली आत्मसमर्णण केलं होतं.
तेलंगणातील पेदापल्ली जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या भूपतीने 1980 साली मोठा भाऊ किशनजीसोबत तत्कालिन पीपल्स वॉर ग्रूपमध्ये प्रवेश केला.
2004 मध्ये माओवादी कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेनंतर तो केंद्रीय समिती सदस्य झाला. एप्रिल 2010 साली छत्तीसगडमध्ये NDRF चे 76 जवान शहीद झाले. या घटनेचा मास्टरमाइंड भूपतीच होता.
2010 मध्ये चेरीकुरी राजकुमार चकमकीत ठार झाल्यानंतर भूपती नक्षल्यांचा प्रवक्ता बनला. तो केंद्रीय समिती पॉलिट ब्युरो मेंबर आणि सेंट्रल कमिटीमध्ये सदस्यही होता.