Jagdish Patil
अभिनेत्री तारा सुतारिया आणि अभिनेता वीर पहारिया याचं रिलेशनशिप आता जगजाहीर झालं आहे.
कारण फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीतील एकत्रित फोटो वीर-ताराने शेअर केले आहेत.
ज्यामध्ये ते दोघे रोमँटिक पोज देताना दिसत असून त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या व्हायरल फोटोंमुळे आता तारा सुतारिया राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांची नातसून होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
कारण वीर पहारिया हा जेष्ठ काँग्रेस नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे.
स्मृती शिंदे आणि संजय पहारिया यांचा तो मुलगा असून वीरचा मोठा भाऊ शिखर पहारिया हा अभिनेत्री जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड आहे.
दरम्यान, काल ताराने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना लिहिलेल्या कॅप्शनमुळे या दोघांचं रिलेशनशिप लपून राहिलेलं नाही.
कारण, ताराने इन्स्टाग्रामवर 'काल रात्री माझ्या फटाक्यासोबत' असं कॅप्शन टाकत पार्टीतले फोटो शेअर केलेत.
या फोटोंत दिवाळी पार्टीसाठी दोघंही सुंदर पोशाखात तयार झाल्याचं दिसत आहे. तर वीरने 'स्काय फोर्स' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.