Tribal Healthcare Scheme : गडचिरोलीमधील 1700 पुजाऱ्यांची यादी! मिळणार 15 रुपये मानधन, ‘आरोग्यदूत’ योजना समजावून घ्या...

Pradeep Pendhare

आदिवासी जिल्हा

आदिवासी बहुल आणि अतिदुर्गम म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्ह्याकडे राज्याचे लक्ष असते. Tribal Healthcare Scheme

Tribal Healthcare Scheme | Sarkarnama

पुजाऱ्यांकडून उपचार

अनेक वर्षांपासून इथले आदिवासी बांधव आजारावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांऐवजी पुजाऱ्यांकडे जातात.

Tribal Healthcare Scheme | Sarkarnama

पुजारी, बाबा, महाराज

सुमारे 30 ते 40 टक्के आदिवासी बांधव आजही आजार बरा करण्यासाठी डॉक्टरांऐवजी पारंपरिक पद्धतींवर विश्वास ठेवून, ते पुजारी, बाबा, महाराजांकडे जातात.

Tribal Healthcare Scheme | Sarkarnama

आरोग्यदूत उपक्रम

याच पुजाऱ्यांला आरोग्यदूत बनवून आदिवासी बांधवांना, डॉक्टरांकडे पाठवण्यासाठी आरोग्यदूत योजना आरोग्य विभाग राबवत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी प्रताप शिंदे यांनी दिली.

Tribal Healthcare Scheme | Sarkarnama

पुजाऱ्यांना मानधन

आरोग्यदूत पुजाऱ्यांना आरोग्य विभागाकडून 15 रुपये मानधन देण्याची तयारी दर्शवली आहे. यासाठी पुजाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे.

Tribal Healthcare Scheme | Sarkarnama

पुजाऱ्यांची यादी

यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास 1700 पुजाऱ्यांची यादी आरोग्य विभागाने तयार केली आहे.

Tribal Healthcare Scheme | Sarkarnama

मृत्यूदर रोखण्यास मदत

या उपक्रमामुळे दुर्गम भागात आरोग्याबाबत जागरूकता वाढून मलेरियासारख्या आजारांवर वेळेत उपचार मिळेल आणि मृत्यूदर कमी होण्यास मदत मिळेल.

Tribal Healthcare Scheme | Sarkarnama

पारंपरिक अन् आधुनिकता

गडचिरोलीतील हा उपक्रम राज्यासाठीच नाही तर देशासाठी आदर्श ठरून, पारंपरिक श्रद्धा आणि आधुनिक वैद्यक यामध्ये समन्वय ठरू शकतो.

Tribal Healthcare Scheme | Sarkarnama

NEXT : 'या' गावात भोंदूबाबांना 'नो एन्ट्री'

येथे क्लिक करा :