Galgotias University : रोबोडॉगच्या वादामुळे चर्चेत आलेल्या गलगोटिया विद्यापीठाचा संस्थापक कोण? एका पुस्तकांच्या दुकानातून उभे केले हजारो कोटींचे साम्राज्य!

Aslam Shanedivan

एआय इम्पॅक्ट समिट

दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये गालगोटिया विद्यापीठाने केलेला कारनामा उघडकीस आला. ज्यानंतर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय.

Galgotias University Owner suneel galgotia | sarkarnama

रोबोट कुत्रा

या प्रदर्शनात ठेवलेला ओरियन नावाचा रोबोट कुत्रा आपण विकसीत केल्याचा दावा विद्यापीठाने करत तो नवोन्मेष असल्याचे म्हटले होते.

Galgotias University Owner suneel galgotia | sarkarnama

Go2 मॉडेल

पण आता हा दावाच खोटा ठरला असून तो चीनच्या यूनिट्री कंपनीचा Go2 मॉडेल असून तो बाजारात 2 ते 3 लाख रुपयांना सहज उपलब्ध असल्याचं समोर आलं.

Galgotias University Owner suneel galgotia | sarkarnama

मालक कोण?

यानंतर आता जगभर विद्यापीठाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत असून या विद्यापीठाचा संस्थापक कोण? आणि त्यांच्या संपत्तीची चर्चा होताना दिसत आहे.

Galgotias University Owner suneel galgotia | sarkarnama

विद्यापीठाची स्थापना

या विद्यापीठाची स्थापना सुनील गलगोटिया यांनी २०११ मध्ये केली असून ते ग्रेटर नोएडामधील यमुना एक्सप्रेसवेजवळ आहे. येथे पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि पीएचडीटे शिक्षण दिले जाते.

Galgotias University Owner suneel galgotia | sarkarnama

सीईओ

सध्या या विद्यापीठाचे सीईओ सुनील गलगोटिया यांचे पुत्र ध्रुव गलगोटिया असून सुनील गलगोटिया यांचा आधी पुस्तकांचे दुकान होते.

Galgotias University Owner suneel galgotia | sarkarnama

बॅरॉनची पुस्तकं

त्यांनी १९८० च्या दशकात गलगोटिया प्रकाशन सुरू केले असून त्यांच्याकडे बॅरॉनच्या SAT, TOEFL, GRE आणि GMAT पुस्तकांचे भारतात वितरण हक्क आहेत

Galgotias University Owner suneel galgotia | sarkarnama

एकूण संपत्ती?

गलगोटिया यांची एकूण संपत्ती हजारो कोटींच्या घरात असून एका मीडिया रिपोर्ट्सनुसार,गलगोटिया यांच्या व्यवसायाचे मूल्य आज सुमारे ३००० कोटी रुपये आहे.

Galgotias University Owner suneel galgotia | sarkarnama

राज्यसभेतून भाजपचे दिग्गज विरोधक होणार निवृत्त : 5 महत्त्वाचे चेहरे होणार माजी खासदार

आणखी पाहा