Jagdish Patil
निरोप देतो देवा, आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही, तर क्षमा असावी, असं म्हणत देशभरातील गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात येत आहे.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, या घोषणांच्या गजरात अनेकांनी साश्रुनयनांनी आपल्या लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप दिला.
मुंबई पुण्यासारख्या ठिकाणच्या विसर्जन मिरवणुका 26 तास उलटूनही अद्याप सुरूच आहेत.
तर दुसरीकडे बाप्पाच्या विसर्जनासाठी राजकीय नेत्यांनी देखील हजरी लावल्याचं पाहायला मिळालं.
अनंत चतुर्दशीनिमित्त गिरगावच्या चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थिती लावली.
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरगावच्या चौपाटीवर गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टीही केली.
चौपाटीवरील मुंबई महापालिका, मुंबई पोलिलांच्या सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाच्या गणपतीलाही एकनाथ शिंदेंनी अखेरचा निरोप दिला.
चौपाटीवर मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, योगेश कदम देखील उपस्थित होते.
मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, पोलीस आयुक्त देवेन भारती, महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनीही बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला हजेरी लावली.