Jagdish Patil
पुण्यात ऐन गणेशोत्सवात वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुषची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याच्या सख्या भाच्याची हत्या करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
आयुष हा क्लासवरून आला होता. तो पार्किंगमध्ये उभा असतानाच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.
ही थरारक घटना नाना पेठ परिसरात घडली असून याच परिसरात 1 सप्टेंबर 2024 रोजी वनराजची हत्या करण्यात आली होती.
वनराजच्या हत्येचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड, शुभम दहिभाते, आंदेकरची बहीण संजीवनी कोमकर, तिचा पती, दीर, भाचा हे होते.
वनराज हा 2017 च्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत नगसेवक म्हणून निवडून आला होता. त्याआधी वनराजची आई राजश्री आंदेकर ही नगरसेवक होती.
नगरसेवक असलेले चुलते उदयकांत आंदेकर यांनी कोमकर कुटुंबाला चालवायला दिलेल दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईत पाडल्याच्या रागातून सख्ख्या दाजीने वनराजची हत्या केली.
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यातच 6 ते 7 टू व्हीलरवरुन 13 ते 14 जणांनी वनराज आंदेकरवर गोळीबार करत कोयत्यानं वार केले.
हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी आधी चौकातील लाईट घालवली. घरात कार्यक्रम असल्यामुळे आंदेकरसोबत इतर सहकारी नव्हतं नेमकी हीच संधी साधत हल्लेखोरांनी त्याची हत्या केली.