सरकारनामा ब्यूरो
गणपती बाप्पाच्या आगमनाच्या वेळी कोकणाकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.
भक्तांना या खड्यांनी भरलेल्या रस्त्यांवरून गणरायाचे आगमन करावे लागणार आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण रखडलेल्याने 17 वर्षांनंतरही काम पूर्ण झालेले नाही.
खड्डे आणि निकृष्ट दर्जामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. गणेशोत्सव काळात प्रवाशांची मोठी कोंडी होते.
कोकणवासीयांना खड्डेमय रस्त्यांचा सामना करावा लागत असून सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
उद्योग, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे.
वारंवार या रस्त्याची डागडुजी करण्यात येते मात्र परिस्थिती पुन्हा जैसे थे!