Mayur Ratnaparkhe
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याला दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी गोळ्या झाडून ठार केलं.
शरद मोहोळ विरोधात पुणे शहर, पिंपरी तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते.
शरद मोहोळ आणि साथीदारांनी टोळीयुद्धातून गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा खून केला होता.
या गुन्ह्यात न्यायालयाने शरद मोहोळ याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
दासवे येथील सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केल्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती
जुलै २०२२ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार केले होते.
येरवाडा कारागृहात कतील सिद्दीकी खून केला होता
शरद मोहोळच्या मृत्यूमुळे पुण्यात पुन्हा गँगवार उफाळण्याची भीती आहे.
शरद मोहोळ हा मोहोळ गँगचा म्होरक्या बनला होता.