Chaitanya Machale
अॅड. गुणरत्न सदावर्ते हे मुळचे नांदेडचे आहेत. त्यांचे शिक्षण औरंगाबाद आणि मुंबईत झाले. ते विविध चळवळींत आधीपासूनच सक्रिय होते.
वकिली करण्याच्या अगोदर ते शिक्षणाने वैद्यकीय डॅाक्टरही झाले होते. भारतीय राज्यघटनेवर पीएच.डी केली आहे.
मराठा आरक्षणाला कडाडून विरोध करत सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते. बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर देखील त्यांनी काम केलेले आहे.
सदावर्ते हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बोलका बाहुला असल्याची टीका शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली होती.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये वकिलांच्या पोशाखात सहभागी झाल्याने सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली
एस.टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करावा, यासाठी सदावर्ते यांनी बंदची हाक देत कर्मचाऱ्यांना संप करण्यास भाग पाडले होते. एसटी बँकेतील वाद देखील त्यांचा चांगलाच चर्चेत आला होता.
ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि ॲड. डॉ. जयश्री पाटील हे दोघे पती-पत्नी आहेत. त्यांना झेन नावाची मुलगी आहे. तिचे नाव 'झेन' या बौद्ध संकल्पनेतून ठेवले गेले आहे.