Ganpatrao Deshmukh : अकरा वेळा आमदार; तरीही एसटीने प्रवास करणारे गणपतराव देशमुख

Vijaykumar Dudhale

मोहोळ तालुक्यात जन्म

गणपतराव देशमुख यांचा जन्म 1927 मध्ये मोहोळ तालुक्यातील पेनूर या गावी झाला.

Ganpatrao Deshmukh | Sarkarnama

पहिल्यांदा 15 मार्च 1962 रोजी आमदार

गणपतआबा पहिल्यांदा 15 मार्च 1962रोजी सांगोला मतदारसंघातून शेकापच्या चिन्हावर आमदार म्हणून निवडून आले.

Ganpatrao Deshmukh | Sarkarnama

केवळ दोन निवडणुकीत पराभव

देशमुख यांनी 1962 पासून 2014 पर्यंत सांगोला मतदारसंघाचे नेतृत्व केले. या कालावधीत केवळ दोन निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

Ganpatrao Deshmukh | Sarkarnama

दोन पाटलांकडून पराभव

सांगोल्यात 1972 च्या निवडणुकीत काँग्रेसचे एस. बापूसाहेब पाटील आणि 1995 च्या निवडणुकीत शहाजी पाटील यांच्याकडून गणपतराव देशमुख हे पराभूत झाले होते.

Ganpatrao Deshmukh | Sarkarnama

एसटीने प्रवास

एकाच मतदारसंघातून, एकाच पक्षाकडून गणपतराव देशमुख हे अकरा वेळा निवडणूक जिंकले आहेत. तो देशातील विक्रम आहे. तब्बल 50 वर्षे लोकप्रतिनिधी राहूनही ते चक्क एसटीने प्रवास करायचे, एवढे ते साधे होते.

Ganpatrao Deshmukh | Sarkarnama

एम. करुणानिधी यांचा विक्रम मोडला

गणपतराव देशमुख यांनी ११ निवडणुका जिंकून तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचा दहा निवडणुका जिंकण्याचा विक्रम मोडीत काढला होता.

Ganpatrao Deshmukh | Sarkarnama

50 वर्षांहून अधिक काळ लोकप्रतिनिधी

गणपतराव देशमुख यांनी तब्बल 50 वर्षांहून अधिक काळ लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहिले आहे.

Ganpatrao Deshmukh | Sarkarnama

वयाच्या 93 व्या वर्षी निधन

गणपतआबा देशमुख यांचे 30 जुलै 2021 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले.

Ganpatrao Deshmukh | Sarkarnama

सूर्य मंदिरात 4000 जणांनी घातला सूर्यनमस्कार, राजकीय नेत्यांचीही हजेरी

Sun Temple Gujarat | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा