Rashmi Mane
जिद्द आणि चिकाटीच्या बळावर ठरवलं ते ध्येय पूर्ण करता येत. आज अशाच एका आयएएस अधिकाऱ्याची गोस्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
जिने आपल्या स्वप्नांना पंख देण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आणि त्यांचे ध्येय पूर्ण केले. आम्ही बोलत आहोत IAS अधिकारी गरिमा अग्रवाल यांच्याबद्दल...
IAS अधिकारी गरिमा अग्रवाल या मध्य प्रदेशातील खरगोन येथील रहिवासी आहेत. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सरस्वती विद्या मंदिर, खरगोन येथे झाले. त्या सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होत्या.
त्यांना दहावीत 92 टक्के गुण मिळाले होते. तर बारावीत असताना गरिमाने 89 टक्के गुण मिळवले होते. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर गरिमा यांनी पुढील शिक्षणासाठी आयआयटी हैदराबादमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
गरिमा यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्या आयपीएस अधिकारीही झाल्या. पण गरिमा यांचे स्वप्न आयएएस अधिकारी होण्याचे होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा परीक्षा दिली.
त्यामुळे जेव्हा 2018 मध्ये त्यांनी दुसरा प्रयत्न केला आणि 40 वा क्रमांक मिळवला त्या आयएएस अधिकारी बनल्या.
आयएएस गरिमा अग्रवाल नेहमीच यूपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सल्ला देतात की, प्राथमिक परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न मुख्य परीक्षेतही विचारले जातात,
त्यामुळे सर्व प्रश्नांसाठी तयार राहा. याशिवाय उमेदवारांनी लेखनाचा वेग आणि मॉक टेस्टवर भर द्या, असा सल्लाही त्यांनी दिला.