Gas Cylinder Rule : गॅस सिलिंडर घेताय? आता 'कोड'शिवाय मिळणार नाही गॅस सिलिंडर; जाणून घ्या नवा नियम

Rashmi Mane

नवा नियम लागू

गॅस सिलिंडर घेताना आता नवा नियम लागू झाला आहे. ‘DAC कोड’शिवाय सिलिंडर मिळणार नाही. ग्राहकांसाठी ही माहिती जाणून घेणे खूप गरजेचे आहे.

LPG cylinder | Sarkarnama

DAC म्हणजे काय?

DAC म्हणजे Delivery Authentication Code. हा प्रत्येक बुकिंगनंतर मिळणारा युनिक कोड असतो, जो डिलिव्हरीवेळी आवश्यक आहे.

LPG cylinder | Sarkarnama

OTPसारखा कोड

DAC नंबर हा OTPसारखाच असतो. सिलिंडर बुक केल्यानंतर तो तुमच्या मोबाईलवर येतो आणि डिलिव्हरीवेळी दाखवावा लागतो.

LPG cylinder | Sarkarnama

का आणला हा नियम?

फेक डिलिव्हरी, चुकीचे बिलिंग आणि गॅस चोरी रोखण्यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांची सुरक्षा वाढते.

LPG cylinder | Sarkarnama

कसा मिळतो DAC?

गॅस बुकिंग केल्यानंतर कंपनी तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर, अ‍ॅप किंवा WhatsApp वर DAC कोड पाठवते.

LPG cylinder | Sarkarnama

डिलिव्हरीवेळी काय करायचे?

डिलिव्हरी बॉय तुमच्याकडे DAC नंबर मागतो. मोबाईलवर आलेला कोड त्याला सांगितल्यावरच सिलिंडर मिळतो.

LPG cylinder | Sarkarnama

कोड दिला नाही तर?

जर DAC नंबर दिला नाही, तर डिलिव्हरी पूर्ण होणार नाही. अशा वेळी सिलिंडर मिळणार नाही.

LPG cylinder | Sarkarnama

कोड मिळाला नाही तर उपाय

नेटवर्क किंवा तांत्रिक अडचण असल्यास घाबरू नका. डिलिव्हरी बॉयकडून कोड पुन्हा मागू शकता किंवा अ‍ॅप/एजन्सीकडून मिळवू शकता.

LPG cylinder | Sarkarnama

Next : आधार कार्ड हरवलेय? 'या' सोप्या स्टेप्सनी मिळवा नवं कार्ड!

येथे क्लिक करा