Rashmi Mane
आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचं ओळखपत्र आहे. बँक, सरकारी योजना किंवा इतर कामांसाठी त्याची गरज पडते. पण ते हरवलं किंवा चोरीला गेलं तर काय करायचं, हा प्रश्न अनेकांना पडतो.
जर तुम्हाला आधार नंबर आठवत नसेल आणि मोबाइल नंबरही लिंक नसेल, तरीही तुम्ही आधार पुन्हा मिळवू शकता. योग्य स्टेप्स फॉलो केल्यास ही प्रक्रिया सोपी आहे.
मोबाइल नंबर लिंक नसल्यामुळे तुम्ही घरी बसून ई-आधार डाउनलोड करू शकत नाही. अशा वेळी तुम्हाला जवळच्या आधार एनरोलमेंट सेंटरला जावं लागेल.
तुमच्या परिसरातील आधार सेंटरमध्ये जाऊन प्रक्रिया सुरू करा. इथेच तुम्हाला नवीन आधार मिळवण्यासाठी मदत मिळेल.
आधार नोंदणीवेळी मिळालेला 28 अंकी एनरोलमेंट आयडी (EID) नंबर असल्यास प्रक्रिया अधिक सोपी होते. तो नंबर सोबत ठेवा.
सेंटरमधील अधिकारी तुमचं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करतील. तसेच काही बेसिक माहिती विचारली जाईल, ज्यामुळे तुमची ओळख निश्चित केली जाईल.
संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला ई-आधार दिला जाईल. यासाठी साधारण 30 रुपये शुल्क आकारलं जातं.
जर तुमचा मोबाइल नंबर आधारशी लिंक असेल, तर तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून घरबसल्या आधार डाउनलोड करू शकता.
वेबसाइटवर जाऊन My Aadhaar सेक्शन निवडा,
Retrieve Lost UID/EID वर क्लिक करा
नाव, जन्मतारीख आणि मोबाइल/ईमेल टाका
OTP टाका
तुमचा आधार तपशील आणि ई-आधार लगेच मिळेल.