Rashmi Mane
घरगुती LPG गॅस ग्राहकांसाठी सरकारने e-KYC अनिवार्य केली आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही तर गॅस सबसिडी थांबू शकते. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाने आपल्या गॅस कनेक्शनची e-KYC करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मोबाईलच्या मदतीने काही मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण करता येते. गॅस एजन्सीत जाण्याची गरज नाही. संबंधित ऑईल कंपनीच्या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे तुम्ही घरबसल्या e-KYC करू शकता. मोबाईलवरूनच आधार प्रमाणीकरण आणि चेहरा पडताळणी करून प्रक्रिया पूर्ण करता येते.
घरगुती LPG गॅस कनेक्शन असलेल्या सर्व ग्राहकांसाठी e-KYC बंधनकारक आहे. सर्व गॅस कंपन्यांच्या ग्राहकांनी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
e-KYC केल्यामुळे गॅस सबसिडी थेट खात्यात जमा होत राहते. तसेच गॅस वितरणात अडथळे येत नाहीत. सरकारने पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट कनेक्शन टाळण्यासाठी हा नियम लागू केला आहे.
पहिल्यांदा तुमच्या गॅस कंपनीचे अधिकृत मोबाईल ॲप डाउनलोड करा. मोबाईल नंबरद्वारे लॉगिन करा आणि e-KYC किंवा आधार प्रमाणीकरण हा पर्याय निवडा. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करा.
Aadhaar FaceRD ॲप वापरून चेहरा स्कॅन करून आधार पडताळणी केली जाते. काही सेकंदांत ही पडताळणी पूर्ण होते आणि तुमची e-KYC यशस्वीरीत्या पूर्ण होते.
जर ग्राहकांनी e-KYC केली नाही तर गॅस बुकिंगवर परिणाम होऊ शकतो. गॅस सिलेंडर डिलिव्हरी थांबवली जाऊ शकते आणि सबसिडी मिळण्यात अडचण येऊ शकते.
e-KYC न केल्यास ग्राहकांना सिलेंडरची संपूर्ण रक्कम भरावी लागू शकते. साधारण 300 ते 400 पर्यंतचा सबसिडीचा फायदा मिळणार नाही. त्यामुळे वेळेत e-KYC करून सबसिडी सुरू ठेवा.