Jagdish Patil
'दिव्यज फाउंडेशन'च्या वतीने 'ग्लोबल पीस ऑनर्स - 26/11 च्या शूरवीरांचे आणि पहलगाम हल्ल्यातील पीडितांचे स्मरण' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
यावेळी एनआयएचे डायरेक्टर जनरल सदानंद दाते देखील उपस्थित होते.
तसंच 26/11 हल्ल्यातील हुतात्म्यांचे कुटुंबीय आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांचे कुटुंबिय उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये 26/11 च्या हल्ल्यातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांसमवेत अभिनेता शाहरुख खान यांनी संवाद साधला.
दिव्यज फाउंडेशनच्या प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आहेत.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी 'शहीदांना वंदन करणारा' कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल दिव्यज फाउंडेशनचे अभिनंदन केलं.
तसंच या कार्यक्रमासाठी रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी नीता अंबानी देखील उपस्थित होत्या.
तर सुनील शेट्टीसह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी या कार्यक्रमाला हजरे लावली होती.