सरकारनामा ब्यूरो
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे मंगळवारी (ता.21)ला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात सहभागी झाले.
अदानी यांनी मंदिरात प्रवेश करताना कपाळवर चंदनाचा गंध लावला.
गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नी प्रीती अदानी यांच्यासह महाकुंभातील इस्कॉन मंदिराचे दर्शन घेतले.
यावेळी गौतम अदानी यांनी व्हीआयपी कॅम्पमध्ये इस्कॉन सदस्यांसह भक्तांसाठी महाप्रसाद तयार केला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यावेळी गौतम अदानी यांच्या पत्नी प्रीती अदानी आणि सून यांनी तेथील उपस्थित महिलांबरोबर प्रसाद तयार करण्यास आणि वाटण्यास हातभार लावला.
अदानींनी तयार केलेला प्रसाद भाविकांमध्ये वाटला. कुंभमेळ्यात येणाऱ्या भक्तांना रोज त्यांच्याकडून महाप्रसाद दिला जात आहे.
महाकुंभातील भाविकांसाठी प्रसाद बनवल्यानंतर गौतम अदानी यांनी सेक्टर-3 येथील व्हीआयपी घाटावर जाऊन सहकुटुंब पूजा केली.