Jagdish Patil
उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते आज बारामती येथे 'शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजेंस'चे उद्घाटन करण्यात आलं.
अदानी यांनी निधी दिलेले हे सेंटर ऑफ एक्सलन्स, पवार कुटुंब चालवणाऱ्या विद्या प्रतिष्ठान अंतर्गत स्थापन करण्यात आलं आहे.
या कार्यक्रमाला विद्याप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, रोहित पवारांसह संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होते.
या कार्यक्रमापूर्वी अदानींच्या स्वागतासाठी अजित पवार यांच्यासह रोहित पवार बारामती विमानतळावर गेले होते.
यावेळी रोहित पवारांनी अदानींच्या कारचं सारथ्य केलं. रोहित यांच्या शेजारी अजित पवार बसले होते.
उद्घाटन सोहळ्यापूर्वी गौतम अदानी आणि त्यांच्या पत्नीने अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्यासोबत संपूर्ण सेंटरची पाहणी केली.
या कार्यक्रमात बोलताना अदानी म्हणाले, 'शरद पवारांना सर्व क्षेत्रातील माहिती अधिक आहे. ते माझ्यासाठी आदरणीय, आदर्श आहेत.'
'मला गेल्या 3 दशकांहून अधिक काळ शरद पवारांना जाणून घेण्याचे सौभाग्य लाभले. त्यांच्याकडून मी जे काही शिकलो ते अतुलनीय आहे.'
तसंच 'दीर्घकालीन राजकारणामध्ये त्यांनी खूप मोठं सामाजिक काम उभारलं असून ते माझे मार्गदर्शक आहेत', असंही अदानी यावेळी म्हणाले.