सरकारनामा ब्यूरो
गौतम अदानीच्या छोट्या मुलगा जीत अदानींच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. शुक्रवारी (ता.7) ला जीत अदानी आणि दिवा शाह यांचा विवाह होणार आहे.
जीत अदानी आणि दिवा शाह यांच्या लग्नासाठी अदानी कुटुंबांनी जवळजवळ 300 लोकांना आमंत्रण दिल्याचं म्हटल जात आहे.
या वऱ्हाडीमंडळीं राहण्यासाठी अदानींनी ताज लेक पॅलेस आणि लीला पॅलेससारखे शाही हॉटेल्स बुक केले आहेत.
उद्य विलास या अलिशान हाॅटेल्समध्ये प्री-वेडिंग ठेवण्यात आले आहे. उद्य विलासच्या कोहिनूर स्वीटचे दररोजचे भाडे सुमारे 10 लाख इतके आहे.
एका मीडिया सुत्रानुसार अदानी यांनी लग्नाला येणाऱ्या वऱ्हाडीमंडळीची लिस्ट तयार केली आहे.
या लिस्टनुसार कोणत्याच सेलिब्रिटी लोकांना निमंत्रण दिलेले नाही, असं अदानी कुटुंबांनी सांगितले आहे. या लग्नाला फक्त अदानी कुटुंब आणि त्यांचे मित्र परिवार असणार आहे.
कॉर्पोरेट
अदानींनी दिव्यांग, कारागीर आणि विणकर या व्यक्तीना विवाह सोहळ्यात आमंत्रित केले आहे. कुटुंबाव्यतिरिक्त भारतीय कॉर्पोरेट जगातील दिग्गज 'या' लग्नसोहळ्याला हजेरी लावणार आहेत.