सरकारनामा ब्यूरो
टाटा समुहाचे अध्यक्ष रतन टाटा यांची 15000 कोटींच्या संपत्तीचा वारसदार कोण असणार याकडे सगळ्याचं लक्ष लागले आहे.
अशातचं त्यांच्या मृत्युपत्रात रतन टाटांनी त्यांच्या संपत्तीतील 500 कोटी रुपये मोहिनी मोहन दत्ता यांच्या नावे केली आहे.
दत्ता यांना टाटांनी 500 कोटीहून जास्त रुपये दिले आहेत. यातील धक्कादायक बाब म्हणजे टाटा आणि दत्ता यांच्याबद्दल कुटुंबातील सदस्यांना काहीच माहिती नाही.
दत्ता हे जमशेदपूरचे असून ते ट्रॅवल्स क्षेत्रात काम करतात.
दत्ता यांच्या कुटुंबाची स्टॅलियन नावाची ट्रॅव्हल एजन्सी होती. मात्र ही एजन्सी 2013 ला ताज सर्व्हिसेस ग्रुप ऑफ हॉटेल्समध्ये विलीन झाली. यात स्टॅलियन या एजन्सीचा 80% हिस्सा हा दत्ता कुटुंबाकडे आणि 20% हिस्सा टाटा इंडस्ट्रीजकडे होता.
मोहिनी दत्ता या टीसी ट्रॅव्हल सर्व्हिसेसच्या संचालक होत्या. ही कंपनी थॉमस कुकशी संबंधित होती.
मोहिनी दत्ता यांना दोन मुली आहेत त्यांपैकी एका मुलीने टाटांच्या ताज हाॅटेलमध्ये आणि टाटा ट्रस्टमध्ये 2024 पर्यंत म्हणजेच नऊ वर्षे काम केले आहे.
टाटा यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान दत्ता यांनी मीडियासमोर सांगितले होते की, त्यांची पहिली भेट जमशेरपूर येथील डीलर्स हॉस्टेलमध्ये झाली होती. टाटा आणि दत्ता हे एकमेकांना 60 वर्षांपासून ओळखतात, असा दावा त्यांनी केला आहे.