गौतमी पाटील, राधा पाटील, ऐश्वर्या जाधव... महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या 3 'डान्सिंग स्टार्स' का आल्यात अडचणीत?

Deepak Kulkarni

महाराष्ट्राच्या डान्सर्स चर्चेत...

राज्यातील दहीहंडी आणि गणेशोत्सवातील अश्लील नृत्य, सुरक्षा व कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्यावरून नृत्यांगना गौतमी पाटील, राधा पाटील आणि ऐश्वर्या जाधव सध्या पोलीस व राजकीय कारवायांमुळे चर्चेत आल्या आहेत.

Radha Patil | Sarkarnama

डान्स आणि स्टेज परफॉर्मन्स

डान्स आणि स्टेज परफॉर्मन्समुळे राधा पाटीलनेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या नृत्यशैलीची आणि स्टेजवरील एनर्जीची सोशल मीडियावरही चर्चा होते.

Radha Patil | Sarkarnama

सोशल मीडियावर क्रेझ..

राधा पाटीलच्या डान्स व्हिडीओंना सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. पारंपरिक लावणीसोबत आधुनिक डान्सचा तडका तिच्या परफॉर्मन्समध्ये पाहायला मिळतो. पुण्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे अडचणीत सापडली आहे.

Radha Patil | Sarkarnama

ऐश्वर्या जाधव

नृत्यकलेच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांमध्ये ऐश्वर्या जाधवचं नावही चर्चेत आहे.

aishwarya jadhav | Sarkarnama

कमी कालावधीत यश

ऐश्वर्यानेही अगदी कमी कालावधीत तिच्या डान्समधील आत्मविश्वास आणि सादरीकरणाच्या वैविध्यपूर्ण व दिलखेचक शैलीमुळे महाराष्ट्रात तिची जबरदस्त चर्चा सुरू झाली आहे.

aishwarya jadhav | Sarkarnama

परवानगी नाकारली

पुणे परिसरातील एका कार्यक्रमात सुरक्षा आणि सामाजिक शांततेचे कारण देत पोलिसांनी ऐश्वर्या जाधव यांच्या नृत्य कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे

aishwarya jadhav | Sarkarnama

मोठी फॅन फॉलोईंग

संपूर्ण महाराष्ट्रभर तरुणाई ते वृद्धांपर्यंत जिच्या लावणी आणि डान्सची हवा आहे. तिने संघर्षातून पुढे येत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. गौतमीला मोठी फॅन फॉलोईंग आहे.

Gautami Patil | Sarkarnama

मानधनही वाढवलं

तिच्या कार्यक्रमांना शहर तसेच ग्रामीण भागांत मोठी मागणी आहे. तिच्या कार्यक्रमाला प्रचंड मोठी गर्दी दिसून येते. वाढलेली लोकप्रियतेमुळे तिने कार्यक्रमाचं मानधनही वाढवलं आहे.

Gautami Patil | Sarkarnama

पोलिसांत तक्रार

गौतमीनं अफाट मेहनत आणि लोकप्रियतेच्या जोरावर महाराष्ट्रातील चर्चेतील कलाकार बनली. पण आता ठाण्यातील दहीहंडी सोहळ्यात 'फ्लाइंग किस' दिल्याच्या कारणावरून आणि अश्लील नृत्याचा आरोप करत भाजप नगरसेविकेने तिच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे.

Gautami Patil | Sarkarnama

NEXT: धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला कधी व कसं मिळालं? काय आहे इतिहास..

Shiv-Sena-Rebellions (1).jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...