Rashmi Mane
केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला.
2019 च्या निवडणुकीत याच मतदारसंघातून पाच लाखांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला होता.
गांधीनगर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मोदी लाटेत हा बालेकिल्ला अधिक मजबूत झाला आहे.
गांधीनगरमध्ये तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी मतदान होणार आहे. या वेळी अमित शाह मताधिक्याचा विक्रम मोडणार का, याबाबत उत्सुकता.
शाह यांना मागील निवडणुकीत एकूण मतांच्या 70 टक्के मते मिळाली होती. त्यांना 8 लाख 90 हजार मते पडली होती.
गांधीनगर हा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा मतदारसंघ. 1991 पासून सहा वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
अर्ज दाखल केल्यानंतर शाह यांनी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी देश सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त केला.
गांधीनगर भागाचे 30 वर्षे आमदार आणि खासदार म्हणून काम केल्याची भावना अमित शाह यांनी व्यक्त केली.
पाच वर्षांत 22 हजार कोटींहून अधिक रुपयांची कामे केली आहेत. त्यामुळे जनतेने नेहमीच माझ्यावर प्रेम केल्याचे शाह म्हणाले.
R