Rajanand More
भारतीय नौदलाचे नवे प्रमुख व्हाइस अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे असतील. ते 30 एप्रिलला पदभार स्वीकारतील.
सध्या नौदलाचे उपप्रमुख असून, आताचे प्रमुख आर. हरी. कुमार यांच्या निवृत्तीनंतर ते नौदलप्रमुख होतील.
त्रिपाठी हे पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच एनडीएचे माजी विद्यार्थी आहेत.
एनडीएमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गोव्यातील नेव्हल वॉर कॉलेज आणि अमेरिकेतील नेव्हल वॉर कॉलेजमध्येही कोर्स केला आहे.
नौदलात एक जुलै 1985 रोजी रुजू झाले असून, आतापर्यंत 30 वर्षे कार्यरत आहेत. दूरसंचार आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे.
नौदालामध्ये त्रिपाठी यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. आयएनएस विनाशची जबाबदारीही पार पाडली.
जून 2019 मध्ये व्हाइस अॅडमिरल म्हणून पदोन्नती. केरळमधील एझिमाला येथील प्रतिष्ठित भारतीत नौदल अकादमीचे कमांडंट म्हणून काम.
जुलै 2020 ते मे 2021 दरम्यान नौदल संचालनच्या महासंचालकपदी नियुक्ती. याच कालावधीत नौदलाच्या समुद्री संचालनातील गतीमध्ये वाढ झाली.
त्रिपाठी यांना अति विशिष्ट सेवा मेडल आणि नौदल मेडलने सन्मानित करण्यात आलेले आहे.
R